Tuesday, May 7, 2013

`वर्क फ्रॉम होम` नको रे बाबा !


संपर्क क्रांतीला सुरवात होऊन आता एक जमाना झालाय. संपर्काच्या माध्यमांमध्ये रोजचे बदल सुरूच आहेत. या नव्या माध्यमांमुळे कामाचं स्वरूप बदललं, वर्क कल्चरही बदललं. गेल्या काही वर्षात वर्क कल्चरमध्ये झालेला सर्वात मोठा बदल म्हणजे कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थिती हा भाग आता अनिवार्य राहिलेला नाही. कम्युनिकेशन क्षेत्रातल्या प्रगतीमुळे रिमोट ऑफिस ही संकल्पना पहिल्यांदा अस्तित्त्वात आली. ऑफिसला येऊन काम करण्याऐवजी कनेक्टिव्हिटी असेल अशा कुठल्याही ठिकाणाहून काम करणं शक्य झालं. वर्क फ्रॉम होमचा पर्याय खुला झाला आणि टेलिवर्किंग हा नवा शब्दप्रयोग रूढ झाला.
सुरवातीला या टेलिवर्किंगचं खूप कौतुकही झालं. कंपन्यांची ऑफिसवरची गुंतवणूक कमी झाली आणि कर्मचाऱ्यांसाठीही घरून काम करण्याची चांगली सोय झाली. कंपन्या आणि कर्मचारी दोघेही या व्यवस्थेवर सुरवातीला खूष होते. आता इथून पुढे टेलिवर्किंग हेच भविष्य राहणार असल्याचं बोललं जात होतं. पण गेल्या काही महिन्यातल्या घडामोडी पाहिल्यास टेलिवर्किंगचं प्रस्थ कमी होताना दिसतंय. घरी बसून काम करण्याचा पर्याय कंपन्या नाकारू लागल्यात आणि पहिल्यांदा आनंदाने तयार होणारे कर्मचारीही आता वर्क फ्रॉम होमला नको म्हणू लागलेत.
आयटी क्षेत्रातली बडी कंपनी असलेल्या याहूने गेल्या महिन्यात कर्मचाऱ्यांसाठी एक नोटीस काढून रिमोट वर्किंगला बंदी घातली. त्याआधीच गूगलकडून देखील अशाच प्रकारची बातमी आली होती. टेलिवर्किंग कमी करत असल्याचे संकेत गूगलच्या उच्चाधिकाऱ्यांनी दिले होते. आमचे कमीत कमी कर्मचारी ऑफिसबाहेरून काम करणारे असतील, असं गूगलच्या अधिकाऱ्याने नुकतच जाहीर केलंय.
गूगल किंवा याहूसारख्या बड्या कंपन्यांचा कित्ता आता अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांनीदेखील गिरवायला सुरवात केली आहे. कर्मचाऱ्यांनी ऑफिसमधूनच काम केलं पाहिजे अशी अट घातली जात आहे. घरून काम करताना ते अपेक्षित गांभीर्याने होत नसल्याचं काही कंपन्यांचं निरीक्षण आहे. वर्क फ्रॉम होमला कंपन्यांकडून विरोध होण्याचं मुख्य कारण म्हणजे रिमोट वर्किंगमध्ये टीमवर्क राहात नाही. टेलिवर्किंगमध्ये कर्मचाऱ्यांनी एकत्र बसून अनौपचारिक चर्चा करण्याची शक्यता नसते. त्यामुळे प्रत्येकजण स्वतंत्रपणे काम करत राहतो आणि टीमवर्कचे फायदे मिळत नाहीत. कितीतरी वेळेला लंचटाईमध्ये अनौपचारिकपणे होणाऱ्या संवादातून नव्या कल्पना उदयाला येतात. एकमेकांमधला हा अनौपचारिक संवादच टेलिवर्किंगमुळे खुंटतो. ऑनलाईन संवादात एक प्रकारचा पोकळपणा असतो, असं कंपन्यांचे मत आहे. व्हिडिओ कॉल, कॉन्फरन्स कॉल यातून किमान अपेक्षित निष्पन्न होतं पण त्यापलिकडचं यश मिळण्याची शक्यताच नसते. म्हणून ऑफिसमधली प्रत्यक्ष उपस्थिती कंपन्यांना आवश्यक वाटायला लागलीयं.
कर्मचाऱ्यांच्या बाजूकडूनही वर्क फ्रॉम होमचं आकर्षण आता हळूहळू मावळायला लागलेय. हा पर्याय सुरवातीला सगळ्यांनाच सोयीचा वाटला होता. पण त्यातल्या गैरसोयी आता पुढे यायला लागल्यात. घरूनच काम केल्यामुळे कामाची वेळ एक ठराविक राहात नाही. कामांचे तास कधी कधी ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांपेक्षाही जास्त व्हायला लागतात. पुन्हा घर हेच ऑफिस असल्यामुळे आयुष्यात काही बदल मिळत नाही. तोच तोचपणा येतो. याला लोक कंटाळतात असं निरीक्षण कॅलिफॉर्निया युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासात नोंदवलं गेलंय. अमेरिकेत सध्या २४ टक्के कर्मचारी रिमोट वर्किंग करतात. पण हा आकडा झपाट्याने खाली येण्याची शक्यता आहे.
अमेरिकेबरोबरच ब्रिटनमध्येही टेलिवर्किंगचं प्रमाण कमी होण्याची चिन्ह आहेत. कुटुंबवत्सल इंग्लिश माणसाने वर्क फ्रॉम होमचं सुरवातीला अगदी जोरदार स्वागत केलं होतं. ब्रिटनमधल्या तब्बल ५९ टक्के कंपन्या टेलिवर्किंगला मान्यता देतात. पण ते प्रमाणही कमी होऊ शकतं, असा लंडन बिझनेस स्कूलचा कयास आहे. लंडन बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी टेलिवर्किंग करणाऱ्यांचं सर्वेक्षण केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, सगळे टेलिवर्कर्स काही खूष नाहीत. वरीष्ठांच्या सतत नजरेसमोर नसल्यामुळे घरून काम करणाऱ्यांच्या बढत्या फारशा होत नाहीत. अनेकदा घरून काम करणाऱ्यांना काम तेवढंच पण पगार मात्र कमी दिला जातो. याशिवाय प्रमोशनच्या संधी डावलल्या जातात, असं या सर्वेक्षणादरम्यान इंग्लिश कर्मचाऱ्यांनी सांगितलंय.
तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी माणसा- माणसातला संवाद हा प्रत्यक्ष सहवासातूनच योग्य वळणावर येतो हे सिद्ध होतंय. संपर्कक्रांतीनं जग जवळ आलंय हे खरं पण माणसं एकमेकांपासून दूर होतील की काय अशी भीती निर्माण झालीय.

बिनपाण्याची !!!


महाराष्ट्रातल्या गावांगावांत पाण्यासाठी सुरू असलेली वणवण विविध माध्यमांतून बघितली की, यंदाच्या दुष्काळाची तीव्रता ध्यानी येतेय. पाऊस लांबला, कमी झाला यामुळे येणारं हे अवर्षण नव्हे. गेल्या कित्येक वर्षात शासकीय आणि वैयक्तिक पातळीवर दुर्लक्षित राहिलेला जलसंवर्धनाचा मुद्दा यावर्षीच्या दुष्काळाने  अधोरेखीत केलाय. मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्रातल्या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठीच जंगजंग पछाडावं लागतंय तिथे शेतीची काय कथा? शहरातल्या लोकांना मात्र दुष्काळाची थेट झळ पोचत नसल्याने या समस्येची तितकीशी जाणीव दिसत नाहीय. एकीकडे गावांत अशी बिकट अवस्था आहे तरीही शहरात आपल्या आसपास कपडे, भांडी, जनावरं, गाड्या, इमारतींच्या काचा धुण्यासाठी भरमसाठ पाणी नासणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. जलसंवर्धनासंबंधी अनभिज्ञता, पाण्याच्या मूल्याची जाणीव नसणं यातून हे घडतं. आपल्याकडे एकूण जलसाक्षरताच कमी आहे. दुष्काळाचा असा प्रश्न किंवा पाण्याचं दुर्भिक्ष काही फक्त आपल्या प्रांतात नाही. जगात असेही काही देश आहेत, ज्यांना पाण्याची टंचाई कायम जाणवत असते. मूळातच ते प्रांत पाण्याच्या दुर्भिक्षाचे. तरीही पाण्याच्या मूल्याची जाणीव असल्याने सामान्य माणूस पाण्याचा सुयोग्य वापर करत असतो. पाण्याविनाही हे देश प्रगती करत आहेत.
मुबलक पाणी नसूनही प्रगतीचा मार्ग शोधणारी राष्ट्रं मिड्ल ईस्ट अर्थात मध्य-पूर्वेत सापडतात. प्यायचं पाणीही विकत घ्यावं लागत असल्याने तिथली जनता पाण्याचं मोल जाणते आणि त्याप्रमाणेच वागते. वर्षभरातून एखाद- दोन वेळा झाला तर पाऊस पडतो या परिस्थितीची आपण कल्पना तरी करू शकू का? पण त्यामुळेच तिथे पाण्याचा अपव्यय टाळला जातो आणि पाण्याचा कमीत कमी वापर करावा लागेल असं तंत्रज्ञान विकसित करण्याकडे कल असतो. यासंदर्भात नुकतीच तिथल्या माध्यमातून आलेली एक बातमी लक्षवेधी ठरली. पाण्याशिवाय गाडी धुण्याचं सोपं तंत्र दुबईतील एका उद्योजकाने शोधून काढलंय. हा उद्योजक मूळचा भारतीय आहे हे विशेष.
ऋषी आणि सानुज कोहली या तरुण उद्योजक बंधूंनी वॉटरवाईज नावाने हा नवा उद्योग सुरू केलाय. फक्त एका स्प्रेच्या स्वरूपात येणारं द्राव आणि एक कापड यांचा वापर करून गाडी स्वच्छ करता येते. पाण्याचा थेंबही न वापरता गाडी स्वच्छ होते आणि वर पॉलिश केल्यासारखी चकाकीही आणली जाते. पाण्याचं दुर्भिक्ष असल्याने या प्रकारच्या उद्योगांना तिथलं सरकारही पाठिंबा देतं.
सुरवातीला केवळ हा स्प्रे तयार करून तो कारवॉशिंग कंपन्यांना विकायला कोहली बंधूंनी सुरवात केली होती. पण नंतर ग्राहकांना थेट सेवा देऊनच याचा प्रसार करण्याचा निर्णय घेऊन कारवॉश कंपनी सुरू केली. हा स्प्रे गाडीवर मारून तो मायक्रोफायबर कापडाने पुसल्यानंतर गाडी धुतल्यासारखी स्वच्छ होते, असा कंपनीचा दावा आहे.
कोहली बंधू फक्त कारवॉशच्या व्यवसायावर थांबले नाहीयतं. स्वतःला इको आंत्रप्रेन्यर्स म्हणवून घेत ते आता इतर सफाईची कामं पाण्याशिवाय कशी करता येतील, याचं तंत्र विकसित करत आहेत. मोठमोठ्या उंच इमारतींची काचेची तावदानं धुण्यासाठी पाण्याचा एक थेंबही लागणार नाही, असं एक तंत्र ते सध्या विकसित करत आहेत. दुबईतल्या गगनचुंबी इमारतींच्या काचा आधुनिक तंत्रानुसार धुण्याचं पेटंट घ्यायचाही त्यांचा विचार आहे.
कोहली बंधूंनी त्यांच्या वडिलांचा इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय पुढे नेण्याबरोबरच हे वॉटरलेस वॉशचं नवं तंत्रज्ञान विकसित केलं आणि बघता बघता वॉटरवाईजचं चांगलंच बस्तान बसलं. सध्या दुबईतल्या कार वॉश मार्केटपैकी ४० टक्के मार्केट वॉटरवाईजने काबीज केलंय, असं एक बातमी सांगते. केवळ पाच कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन सुरू केलेली कंपनी आज बरीच मोठी झालीय.
आपल्या देशातही अशा काही नव्या तंत्रांची गरज आहे. पण गोड्या पाण्याचा साठा अमर्याद नाही, याची जाणीवजागृती करणं हे त्याआधीचं काम. कारण त्यातूनच असे नवे प्रयोग स्फूरू शकतील. चिरंतन विकासाच्या दृष्टीने आधी जलसाक्षरता ही महत्त्वाची पायरी आहे.

Thursday, January 10, 2013

जागतिकीकरणाची नवी संस्कृती

ब्रिटनमध्ये गेल्या वर्षी झालेल्या जनगणनेचे आकडे नुकतेच जाहीर झाले आणि त्यातल्या काही आकड्यांमुळे कट्टर इंग्लिश जनतेला थोडा धक्काच बसला. मूळ ब्रिटीश नसलेल्या नागरिकांच्या संख्येत गेल्या दहा वर्षात ५० टक्क्यांनी वाढ झाल्याचं हे आकडे सांगतात. इंग्लंड आणि वेल्समधील ७५ लाख लोकसंख्या जन्माने ब्रिटीश नाही. इंग्रजांच्या देशात ३० लाख घरे इंग्रजीखेरीज इतर भाषा बोलणारी आहेत. २००१ च्या जनगणनेच्या वेळी ८७ टक्के जनता ‘व्हाईट ब्रिटीश’ म्हणून गणली गेली होती. आता या मूळ रहिवाशांची संख्या फक्त ८० टक्क्यांवर आलीय. ब्रिटनबाहेर जन्मलेले आणि आता इथले नागरिक झालेले सर्वाधिक लोक लंडन परिसरात राहतात. इंग्रजी राजधानीच्या काही भागात तर मूळचे ब्रिटीश नागरिक अल्पसंख्याक झालेत असं या ताज्या जनगणनेतून उघड झालं आहे. स्थलांतरितांसंदर्भातील नियम आणि धोरण असंच सुरू राहिलं तर येत्या काही वर्षात ब्रिटनचा एक नवाच चेहरा समोर येईल, अशी भीती इथल्या मूळ रहिवाशांना आता वाटू लागलीय.

बाहेरच्या देशांतून इथे स्थलांतरित झालेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या आपल्या भारतीयांची आहे आणि त्याखालोखाल पाकिस्तानी नागरिकांची आहे. हा आशियायी नागरिकांचा ओघ गेली ४ दशके सुरू आहे. त्याआधी इंग्लंडमध्ये आयर्लंडमधून आलेल्या लोकांनी ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर बस्तान बसवलं होतं. नॉनब्रिटिश लोकसंख्येत सर्वाधिक आयरिश होते. ती जागा नंतर आशियायी नागरिकांनी घ्यायला सुरुवात केली. पण आश्चर्य म्हणजे गेल्या दहा वर्षात सर्वात अधिक स्थलांतर गोऱ्या युरोपीय नागरिकांचंच झाल्याचं दिसतं. पोलंडहून इंग्लंडला स्थायिक झालेल्यांची संख्या गेल्या दशकात अचानक वाढलीय. युरोपीय युनियनमध्ये पोलंडच्या समावेशानंतर ही संख्या वाढली. पाच लाखांवर पोलिश नागरिक सध्या इंग्लंड आणि वेल्समध्ये राहतात.

जनगणनेचे आकडे आता जाहीर झाले असले, तरीही गेल्या काही वर्षांपासूनच परप्रांतीयांना पोसतात म्हणून इथल्या सत्ताधिकाऱ्यांना वाढत्या रोषाला सामोरं जावं लागतय. २००८- ०९ च्या आर्थिक वर्षात ब्रिटनला मंदीची झळ बसली होती. त्याचा परिणाम म्हणून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि बेकारी वाढली. आता काही ब्रिटीश राजकारणी याचं खापर परप्रांतातून वाढलेल्या स्थलांतरितांवर फोडत आहेत. या राजकीय दबावातूनच दोन वर्षांपूर्वी व्हिसाच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले. ब्रिटनमध्ये काम करण्यासाठी मिळणारा टियर वन व्हिसा सहजासहजी मिळणं बंद झालं. इमिग्रेशनसंदर्भातील काही प्रक्रिया आणखी कडक करण्यात आल्या. ब्रिटीश प्रशासनाने यापूर्वी केलेल्या हलगर्जीपणातून अनेकांनी बेकायदा स्थलांतर केलय. शेकडो नागरिक नियम धाब्यावर बसवून देशात आले आणि आता ते यशस्वी व्यवसाय करून श्रीमंत बनले आहेत. (यात सर्वाधिक संख्या आशियायी नागरिकांची आहे) या संदर्भातील बातम्या, लेख आता स्थानिक वृत्तपत्रांतून, ब्लॉगवरून प्रसारित होत आहेत. अशा प्रकारे स्थानिकांच्या मनात रोष निर्माण झाला तर त्यातून प्रांतवाद आणि वंशद्वेश बळावण्याचा धोका असतो. ती भीती आता उघड बोलली जातेय. परप्रांतीय हा सध्या महाराष्ट्रात गाजत असलेला महत्त्वाचा मुद्दा ब्रिटनच्या राजकारणातही कळीचा ठरणार अशी चिन्ह दिसताहेत.

एका बाजूला अशा प्रकारे वंशद्वेशाची, प्रांतवादाची भीती वाटत असतानाच जागतिकीकरणाचं एक नवीन रूप मात्र हळूहळू उलगडत असल्याचं याच आकड्यांतून पुढे येतय. ब्रिटनच्या या ताज्या जनगणनेतून समोर आलेली एक ठळक बाब म्हणजे परप्रांतीयांच्या या लोंढ्यांबरोबर एक नवी संस्कृती देशात रुजू पाहतेय. जागतिकीकरणाच्या लाटेनंतरचे बदल आता ठळकपणे दिसू लागले आहेत. स्वतःची ओळख मिश्र वंशीय सांगणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. धर्म हा मुद्दा अजूनही जनगणनेत महत्त्वाचा मानत असले तरी जागतिकीकरणाच्या जमान्यात निधर्मी जनतेची संख्या वाढतेय. आपण कोणताही धर्म मानत नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या ब्रिटनमध्ये गेल्या दशकभरात दुपटीने वाढली आहे. ही महत्त्वाची सांस्कृतिक घडामोड असल्याचं ब्रिटीश ह्युमॅ्युमॅनिस्ट सोसायटीचं मत आहे. ताज्या जनगणनेवेळी ‘नो रिलीजन’ असं सांगणाऱ्यांची संख्या १ कोटी ४० लाख झाली आहे.

वंश, धर्म यावरून येणारी ओळख नाकारणारे वाढले आहेत, तसेच पारंपरिक प्रांतीय, भाषिक ओळखही महत्त्वाची न मानणारी पिढी निर्माण होत आहे. महानगरांमधलं तिचं अस्तित्त्व लक्षात घेण्याएवढं वाढलय. ‘इंडिपेंडंट’मध्ये आलेल्या वृत्तानुसार, बहुतांश लंडनकर आता स्वतःला ‘इंग्लिश’ म्हणवून न घेता ‘ब्रिटीश’ म्हणणं पसंत करतात.

सांस्कृतिक बदलांच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जीवनशैली. नव्या पिढीचं राहणीमान, जीवनशैली झपाट्याने बदलत आहे. ब्रिटनच्या इतिहासात प्रथमच समाजातील अविवाहितांची संख्या विवाहितांपेक्षा अधिक झाली आहे. याला कारण अधिकाधिक तरुण जोडपी लग्नाच्या बंधनात न अडकताच एकत्र राहणं पसंत करताहेत. लिव्ह इन मध्ये राहणाऱ्यांचं प्रमाण वाढलय. आता ब्रिटनमधल्या विवाहितांची संख्या केवळ ४७ टक्के एवढीच राहिली आहे. तब्बल ३५  टक्के जनतेने आपण ‘सिंगल’ असल्याचं सांगितलं आहे. या एकटं राहण्यामागच्या कारणांचा वेध घेतला असता काही तज्ज्ञांनी याला संपर्कक्रांती जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे आणि दिवसेंदिवस वाढणाऱ्या सोशल नेटवर्किंग साईट्समुळे एकत्र जगण्याची वेगळी गरज कदाचित उरलेली नाही. एकट्यानं राहणंच सोयीचे वाटू लागलं आहे, असं या तज्ज्ञांना वाटतं. समलिंगी संबंधांना समाजात हळूहळू स्थान मिळत असल्याने त्याची संख्याही वाढलेली दिसते. अशा प्रकारे एकलाखांवर समलिंगी व्यक्ती या देशात आता एकत्र राहताहेत, असंही जनगणनेचे आकडे सांगतात.

या आकडेवारीच्या विश्लेषणावरून आणि त्यामागे दडलेल्या कारणांचा विचार करता हा विषय ब्रिटनपुरता राहिलेला नाही हे निश्चित. केवळ एका देशाच्या जनगणनेचे आकडे यापेक्षा याचा आवाका मोठा आहे. धार्मिक, वांशिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांचे वारे कोणत्या दिशेला वाहताहेत हे यातून पुरेसं स्पष्ट होताना दिसतय. जागतिकीकरणाच्या या नव्या संस्कृतीचे आपण सगळे साक्षीदार होतोय.... खरं तर आपणच ती संस्कृती घडवतोय.



(मेनका जानेवारी २०१३ अंकाच्या नजरेपलिकडचे या सदरामध्ये हा लेख प्रथम प्रकाशित झाला आहे.)

Saturday, December 1, 2012

भारत माझा देश आहे...

आपल्या देशाचा अभिमान असणे आवश्यकच आहे. मराठी माणसाला तर भारतीय असण्याचा त्यातून मराठी असण्याचा, नुसता नाही तर जाज्वल्य अभिमान असतो. आपल्या भारत देशाने एकविसाव्या शतकात खूप प्रगती केली आहे आणि आता आपण विकासाची नवी शिखरे गाठणार आहोत. आपला भारत देश जगात समर्थ राष्ट्र होणार आहे..... कोणत्याही व्यासपीठावरून (शाळेचे स्नेहसंमेलन, जाहीर सभा, कोपरा सभा, मेळावा, शिबिर, सत्कार समारंभ, निरोप संमारंभ, पुस्तक प्रकाशन, साहित्य संमेलन,आणखी कसले संमेलन, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, गेला बाजार.. हास्य क्लबातसुद्धा) नेहमी ऐकू येणारे हे वाक्य. या कंसातील सगळ्या सोहळ्यांमध्ये शाल- श्रीफळाइतकेच महत्त्व भारताचा विकास आणि त्याबद्दलच्या अभिमानाला आहे. नाही... यात गैर काहीच नाही. मलाही माझ्या देशाचा अभिमान आहे. विशेषतः देशाबाहेर फिरताना तर भारतीयत्त्व प्रकर्षाने जाणवते. आपली ओळख प्रथम एक भारतीय म्हणून करून देतो आपण. परदेशात फिरताना नुसत्याच एशियन ऐवजी भारतीय म्हणून ओळखले गेलो तर उरात अभिमानच असतो फक्त. पण आपलेच देशबांधव कधी कधी असे वागतात की कुठे बघू असे होते. असे काही प्रसंग वाट्याला येतात की कधीकधी 'मी नाही त्या गावची' असे म्हणण्यात आनंद वाटतो. आपला महान देश, त्याची महान परंपरा यांच्याशी पायिक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करते. (तशी प्रतिज्ञाच घेतली होती ना आपण सर्वांनी.) पण पर्यटनानिमित्त बाहेर फिरताना काही देशबांधव पाहिले की ते मात्र ही प्रतिज्ञा विसरलेले दिसतात. सौजन्याने वागण्याची प्रतिज्ञेतील साधी अपेक्षाही देशबांधव कधी कधी पूर्ण करत नाही. आपल्या देशाबद्दल मग बाहेरील जगात गैरसमज पसरत जातात किंवा आधीच पसरलेल्या गैरसमजांना आणखी खतपणी मिळत जाते. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहेपण...हा पण समजावून सांगण्यासाठी मी नुकतेच अनुभवलेले तीन प्रसंग सांगते. तीनही प्रसंग परदेशात अनुभवायला आलेले. (चरितार्थ चालवण्यासाठी अस्मादिकांचा मुक्काम हल्ली इंग्लंडच्या परदेशात असतो हे आधी नमूद करते.)

प्रसंग १
स्थळ – स्कॉटलंड
काळ – ब्रिटनमधील लाँग वीकएंड

निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण बघायला, ऐतिहासिक शहरे बघायला स्कॉटलंडला येणे झाल्यामुळे आमची स्वारी खुशीत होती. एडिंबरा शहर बघितले. स्कॉटिश तैनातीमधला भुईकोट किल्लाही (कॅसल) बघितला. तिथेच एडिंबरामधील भुईकोटाच्या दारात मराठी आवाज ऐकू आला. ‘ए चला लवकर... भेळेचे पुडे नंतर उघडा आधी आत या. अस्मादिकांना अधिक आनंद जाहला. जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी आवाज कसा घुमतोय, हे प्रत्यक्ष ऐकू आले. आणखी एका हॉटेलमध्ये पुन्हा एक मराठी कुटुंब ऐकले’. या वेळी जाऊन ओळखही काढली. हल्ली किती ठिकाणी कसे भारतीय लोक भेटतात, याचे किस्से एकमेकांना ऐकवत निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळीच स्कॉटिश हायलंडची सफर करण्यासाठी एक टूर आरक्षित केली होती. वेळेत पोचण्यासाठी टूरची बस निघण्याची जागा आधीच शोधून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी हसतमुख आणि उत्साही स्कॉटिश गाईड लाभला आणि प्रवासाला सुरवात झाली. बसमध्ये बघतो तर काय २५ पैकी ८ -१० तरी चेहरे भारतीय वाटत होते. आनंद झाला. पुन्हा एकदा अभिमानाने ऊर भरून आला. उरलेले पर्यटक ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, मलेशिया अशा विविध देशांतून आले होते. टूर गाईडने ओळख करून देतानाच वेळेचे महत्त्व सांगितले आणि वर खास सूचना नमूद केली. काही देशांतील लोकांना वेळेचे फार महत्त्व नसते, तर अशांसाठी टूर थांबणार नाही. त्याच्या बोलण्याचा रोख आपल्या’ लोकांकडे कसा होता, याची मराठीत आपापसात चर्चा झडली. एकूणच भारतीयांना कसे उगीचच कमी लेखतात, आपली प्रगती त्यांना सहन होत नाही, जळतात... वगैरे निष्कर्षाप्रत आम्ही पोचलो. त्या स्कॉटिश गाईडकडे एक तीव्र कटाक्ष टाकून गप्प बसलो.
पहिला फोटो स्टॉप झोकात पार पडला. दुसऱ्या स्थळी हवाई पाळण्यातून (याला सोप्या मराठीत केबल कार किंवा गंडोला म्हणत असावेत) डोंगरावर चढण्याचा प्रसंग आला. पुन्हा एकदा कसे वेळेत खाली येणे गरजेचे आहे, नाहीतर पुढचा कॅसल बघण्याची वेळ निघून जाईल वगैरे आमच्या स्कॉटिश गाईडने सांगितले. सगळे निसर्गदर्शन करून आम्ही वेळेत बसपाशी आलो. तेव्हा अर्धी बस रिकामी होती. पाच मिनिटांत उरलेले सहप्रवासी आले. तरी बसमधील प्रवासी संख्या चारने कमी होती. १० मिनिटे झाली... हे ४ जण अजून गायब होते. १५ मिनिटे, २० मिनिटे, २५ मिनिटे झाली तशी सर्वांची सहनशक्ती संपत आली. स्कॉटिश गाईडचे वेळेचे महत्त्व यावरील भाषण एकीकडे सुरूच. दिलेल्या वेळेपेक्षा तब्बल अर्ध्या तासाने हसत- खिदळत चौकडी बसकडे येताना दिसली. आम्ही खिडकीतून पाहतो तो काय… ते तर एतद्देशीय बांधव निघाले. बसजवळ येताच आपणच उशीरा आलो असल्याचे त्यांच्या लक्षात आले असावे. कारण चेहऱ्यावरील भाव चटकन बदलले. ते आत येण्याआधी खाली उतरून आमच्या स्कॉटिश गाईडने त्यांना काहीतरी सुनावले असणार. बस सुरू करण्यापूर्वी त्याने एक तीव्र कटाक्ष आमच्यावरही टाकल्याचा भास झाला. काहीच चूक नसताना आमची मान अपराधी असल्यासारखी खाली गेली आणि तो नव्या जोमाने इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये कसे वेळेचे महत्त्व पाळले जाते हे सांगू लागला. यापुढे बस कोणासाठीही थांबणार नाही हेदेखील त्याने पुन्हा सांगितले. तीन दिवसांच्या या प्रवासात असा अनुभव आणखी एकदा आला हे विशेष. या वेळी अर्धा तासाऐवजी १० मिनिटे थांबावे लागले आणि लेट लतीफ पुन्हा दुसरे एक आपले भारतीय जोडपे.
***
प्रसंग २
स्थळ – हायडेलबर्ग, जर्मनी
काळ – दुसरा एक लाँग वीकएंड

ब्रिटनमुक्कामी असेपर्यंत देशाटन करून घ्यावे आणि थोडे आणखी शहाणपण मिळवावे असे वाटत असल्याने शक्य तेवढा आणि झेपेल तेवढा प्रवास करण्याचे ठरविले होते. त्यातून केल्याने (पर)देशाटन येते (जास्त) शहाणपण असा आम्हीच अर्थविस्तार केला. प्रथम जर्मनीकडे प्रस्थान ठेवले. गेल्या वेळी स्कॉटिश गाईडने केलेला भारतीय बांधवांचा उद्धार लक्षात ठेवून या वेळी लंडनस्थित अस्सल भारतीय पर्यटन कंपनीची टूर निवडली होती. तर अशा प्रकारे एतद्देशीय बांधवांच्या साथीत पहिलाच मुक्काम जर्मनीतील हायडेलबर्ग नामे शहरात घडला.
मुक्कामाचे हॉटेल सुंदर होते. परकीयांच्या दर्जापरीक्षणानुसार म्हणे तीन तारांकितही होते. खोल्या स्वच्छ आणि आवश्यक गोष्टींनी सजवल्या होत्या. आमच्या भारतीय मनोवृत्तीनुसार हॉटेलमध्ये गेल्यावर सर्वप्रथम लक्षात घेतले जाते स्वच्छतागृह. त्यातील स्वच्छता बघूनच आम्ही हॉटेलचा दर्जा ठरवतो. तर त्याप्रमाणे आम्ही या तीन तारांकित हॉटेलचे स्वच्छतागृह तपासून पाहिले. दारातच आमच्यासाठी एक पत्रक आढळले. त्यावर स्वच्छतागृहाच्या वापराविषयी माहिती होती. हॉटेल व्यवस्थापकाच्या सहीने असलेली तळटीप मात्र लक्षवेधक होती. भारतीय ग्राहकांसाठी असे ठळक अक्षरात लिहून परकीय पद्धतीचे शौचालय भारतीय लोक कसे अयोग्य रितीने वापरून खराब करतात हे उद्धृत करून वर ते आपण कसे वापरायला पाहिजे याचा खुलासा लिहीला होता. आता जगभर फिरणाऱ्या आमच्या भारतीय बांधवांना काय शौचालय वापरता येत नसेल का, असा विचार आला. वर फक्त भारतीय ग्राहकांसाठी असे लिहून आमच्या मूळ स्वच्छता सवयींवरच अविश्वास दाखवला गेला होता. स्वाभिमानी भारतीय मन त्यामुळे दुखावले गेले. खोलीत अर्थातच कसे अजूनही भारतीयांना कमी लेखतात, खरे तर युरोपीय पर्यटनस्थळांवर आजकाल चीनी लोकांखालोखाल भारतीयांचीच गर्दी असते, जग फिरण्याची आमची क्षमता आहे आणि धमकही आहे वगैरे चर्चा रंगली. थोड्या वेळाने जेवायच्या टेबलावरदेखील याविषयी आजूबाजूच्या टेबलवरून चर्चा ऐकली. शेवटी लंडनस्थित अस्सल भारतीय कंपनीच्या व्यवस्थापकापुढे आमच्या मनातील खेद सामूहिकरित्या व्यक्त करण्यात आला. भारतीयांच्या स्वच्छतेविषयीच्या सवयींवर आक्षेप व्यक्त करणाऱ्या आणि परिणामी भारतीयांना कमी लेखणाऱ्या हॉटेलमध्ये आमची सोय एका भारतीय कंपनीनेच का करावी, असा सवालही उपस्थित झाला. या अपमानास्पद वागणुकीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त झाला. त्यावर त्या लंडनस्थित भारतीय कंपनीच्या व्यवस्थापनाने दिलगिरी व्यक्त केली पण हे पत्रक इथे उतरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयीचा अनुभव लक्षात घेऊनच लिहिले गेले आहे. आपल्यापैकी काही लोकच याला जबाबदार आहेत’, अशी मल्लीनाथीही वर केली. जी आमच्यासह कित्येकांस रुचली नाही.
पुढील दोनच दिवसात लंडनस्थित अस्सल भारतीय कंपनीचा व्यवस्थापक खोटे बोलत नव्हता हे सिद्ध झाले. स्वित्झर्लंड मुक्कामी तेथील हॉटेलमधील एका खोलीतील स्वच्छतागृह तुंबल्याची आणि ते आपल्यापैकीच एकाने अयोग्य तऱ्हेने वापरल्याची खबर आली. बातमी ऐकताना पुन्हा एकदा स्वित्झर्लंडच्या अनुभवासारखीच आमची कोणतीही चूक नसताना आमचीच मान शरमेने खाली झाली.
या प्रवासात एकदा नाही तर अनेक वेळा हा मान खाली जाण्याचा प्रसंग आमच्यावर गुदरला. स्वित्झर्लंडमधील माउंट टिटलीस या आल्प्स पर्वतराजीतील एका शिखरावर आम्ही चढलो होतो. चढलो म्हणजे हवाई पाळण्यातून गेलो आणि शिखरावर उतरलो. तिथल्या हिमाच्छादित सौंदर्याने भारावून गेलो. आपल्या (पुन्हा आपल्या) हिमालयावर देखील अशी कितीतरी सौंदर्यस्थळे आहेत. तिथे अशी पर्यटन स्थळे विकसित करता येतील, ती का बरे होत नसावीत, किंबहुना हिमालयाचे सौंदर्य काकणभर जास्तच असेल,ते कदाचित थोडे रौद्र भासेल वगैरे सखोल चर्चा त्या टिटलीस पर्वतशिखरावरच्या गोठवणाऱ्या थंडीत उभे राहून केली. छायाचित्रांचा कार्यक्रम उरकला आणि बर्फात साकारलेले मानवनिर्मत सौंदर्य निरखण्यासाठी 'आईसकेव्ह'चा रस्ता धरला. बर्फाच्या गुहेत बर्फातूनच साकारलेले विविध आकार, बर्फाच्या वस्तू न्याहाळत होतो. तेवढ्यात त्या पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या लादीवर उठून दिसेल अशी लालेलाल खूण नजरेस आली. पान अगर तंबाखू (गुटखा, मावा, जर्दा की आणखी काही) खावून थुंकलेली ती रंगीत पिचकारी पाहिली आणि शरमेने मान खाली जाण्याआधी मस्तकात तिडीक गेली. आमच्या आधी तिथे एक मोठा भारतीय गट येऊन गेला होता आणि हे रंगकाम त्यांच्यापैकीच कोणाचे तरी असणार हे तिथल्या बर्फाइतकेच पारदर्शी होते.
आणखी एकदा स्वित्झर्लंडमधीलच एका रेल्वे प्रवासात खिडकीतून एक पाण्याची रिकामी बाटली आणि प्लॅस्टिकचे पुडे भिरकावलेले पाहिले. भिरकवणाऱ्या हातांचा नजरेने शोध घेतला तेव्हा सोन्याच्या बांगड्या घातलेला पाचवारी साडीतील हात दिसला. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे.
***
प्रसंग ३
स्थळ – पॅरिस, फ्रान्स
काळ – तिसरा आणि उन्हाळ्यातील शेवटचा लाँग वीकएंड

कला, संस्कृती, सौंदर्य अशी नजाकतीने भरलेली फ्रान्सची राजधानी बघण्याचा कार्यक्रम सुरू होता. दिवस तसा छान उन्हाळी असल्यामुळे पॅरिस गजबजलेले होते. कदाचित जोडून सुटी आल्यामुळे जिथे –तिथे माणसांचे जथ्थे दिसत होती. पर्यटकांसाठी पंढरी असलेल्या पॅरिसमध्ये नेहमीच अशी गर्दी असते म्हणे, आमच्याबरोबरच्या जाणकारांनी माहिती पुरवली. पॅरिसनगरीच्या शिरपेचातील तुरा शोभणाऱ्या आयफेल टॉवरला भेट देण्यास उत्सुक होतो. तिथे गेल्यावर समजले की या टॉवरच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर घेऊन झाणारा एकच विजेचा पाळणा (सोप्या मराठीत लिफ्ट) सुरू आहे. इतर तीन पाळणे बंद असल्यामुळे वर जाण्यासाठी उत्साही पर्यटकांची ही लांब रांग लागली होती. किमान ३ तास उभे राहावे लागणार, असे पुन्हा जाणकारांनी सांगितले. पण इलाज नव्हता. पॅरिसनगरीचे सौंदर्य त्या जागतिक आश्चर्य मानल्या गेलेल्या टॉवरवरून बघण्याची ओढ लागली होती. हळूहळू सरकणाऱ्या रांगेत धीर न सोडता वाट बघत होतो. बरोबरचे काही आपले भारतीय बांधव फारच अधिर झाल्याचे जाणवले. मुले-बाळे बरोबर असणाऱ्यांचे तिथेच खाऊच्या पुड्या सोडणे सुरू झाले. मग खाऊन-पिऊन तृप्त झाल्यावर याच मुलांचा रांगेतून पुढे – मागे खेळ सुरू झाला. मुलांपेक्षाही अधिर असलेल्या त्यांच्या पालकांनी मग शक्कल लढवली. अरे बेटा किधर जा रहे हो’, असा नारा देत मुलांना दिले रांगेत सोडून. बच्चे कंपनी (खेळता खेळता) पुढे गेली आणि मागून त्यांचे चाणाक्ष पालक बच्चे है असे म्हणत हसत हसत चक्क पुढे जाऊन उभे राहिले. या प्रकाराला सभ्य मराठीत घुसखोरी म्हणत असावेत. रांगेतील इतर पर्यटकांनी या प्रकाराबाबरत नापसंती व्यक्त केली. पण आपण त्या घुसखोरीच्या गावचेच नसल्याचा आव त्या अधिर पालकांच्या चेहऱ्यावर होता. उलट आपल्या अक्कलहुशारीमुळे आणि आपल्या लाडक्या मुलांच्या कर्तृत्त्वाने आपण कसा एक तास वाचवला याचेच तोंडभर सुख तिथे होते. आपल्यासारखे भारतीय प्रवासी रांगेतून थोडे जरी इकडे तिकडे करू लागले की गोऱ्या कपाळांवर चटकन आठ्या का पडतात, याचा उलगडा आत्ता झाला.
फ्रान्समधील गर्दीच्या आणखी एक- दोन पर्यटनस्थळांवर असेच अनुभव आले. बसमधून उतरल्यावर आपणच कसे आधी पोचणे आवश्यक आहे, अशा भावनेत आपले बांधव अक्षरशः पळताना पाहिले. रांगेची शिस्त सर्वांना ही पाटी फक्त सगळीकडे लिहीलेली असते. त्याचा आपल्याशी काही संबंध नाही, या थाटात आपल्या देशात आपण वावरतो. इथेही तीच भावना दिसली. छायाचित्र काढतानादेखील भारतीय अधीरता दिसत होती. भरभर पुढे जाऊन मोक्याच्या ठिकाणी उभे राहायचे आणि दुसऱ्यांच्या छायाचित्रांतही आपली छबी कशी येईल, याची दखल घेण्याचे उद्योग सुरू होते. बसमध्ये गाईड काही माहिती देत असेल, टूरमध्ये काही महत्त्वाच्या सूचना सुरू असतील तेव्हाच आपल्या भाचेमंडळींना (बांधवांचा बालचमू) कसे रडावेसे, ओरडावेसे वाटते आणि त्यांनी शांत राहावे असे त्यांच्या पालकांनाच कसे वाटत नसते हेही वारंवार अनुभवले.  भारतीय पर्यटकांची बस येताना दिसली की बाकीचे पर्यटक तिथून काढता पाय घेत असावेत, असे जाणवले. मी नाही हो त्या गावची हे तिथे म्हणावेसे वाटले. शरमेने मान खाली जाणे, मस्तकात तिडीक जाणे यानंतरची ती पायरी होती. सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे म्हणताना आता नेहमी याबंधू-भगिनींची आठवण झाली.
***
तर अशा या तीन प्रसंगांचे वर्णन केल्यानंतर मला आणखी काही मतप्रदर्शन करण्याची गरज वाटत नाही. आपल्यासारख्या परदेशी राहणाऱ्या व्यक्तींना नक्कीच यातल्या काही बांधवांचे दर्शन कुठे ना कुठे तरी झाले असणार याची मला खात्री आहे. सरतेशेवटी एक नक्की सांगावेसे वाटते. मायदेशी असताना हे असले प्रसंग आणि अशी दृष्ये सतत दिसत असतात. तिथे हे सगळे नवे नाही.सबकुछ चलता है’, यहाँ पे ऐसेही चलता है’, करना पडता है वगैरे भंपक तत्त्वज्ञान सतत ऐकत आल्यामुळे आपल्या देशात ही बेशिस्ती, असंस्कृतपणा आपण सतत खपवून घेत असतो. किंबहुना आपणही त्याचाच एक भाग असतो. परदेशात आल्यावर इथली शिस्त बघून, वक्तशीरपणा बघून सुखावतो. असे शिस्तशीर वागले की विना कटकट कामे होतात, मनस्ताप होत नाहीत आणि असेही सुंदर जगता येते, सौजन्याने वागता येते याची जाणीव होते. त्यातून कधी तरी या शिस्तीच्या कारभारावर आपल्या बांधवांनी भारतीय छाप टाकली की नजरेतून सुटत नाही. उलट अधिकच नजरेला खुपते. आपल्याबद्दल, आपल्या देशबांधवांबद्दल इतर देशांमध्ये काय बोलले जाते, आपली तिथे कशी प्रतिमा आहे आणि याला जबाबदार आपणच कसे आहोत हे सतत जाणवत राहते. प्रत्येकाने काही थोडे संयमाने आणि सौजन्याने वागले तर ही परिस्थिती ओढवणार नाही. आता परदेशात आपण एवढ्या संख्येने येतो - पर्यटक म्हणून, नोकरदार म्हणून किंवा व्यावसायिक म्हणून. आपल्या देशाचे आपण तिथे प्रतिनिधीच असतो. त्यामुळे देशाची प्रतिमा उंचावण्याची जबाबदारीही आपल्यावर असते. शेवटी भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, हे आत्ता आहे त्यापेक्षा जाज्वल्य अभिमानाने आणि ताठ मानेनेच सतत सांगता यावे यासाठी थोडे अधिक सौजन्याने वागले तर प्रतिज्ञा खरी होईल. आणि शेवटी माझ्या देशावर माझेही प्रेम आहेच की आणि त्या प्रेमापोटीच हा लेखप्रपंच.
----------------------


(हॉलंडमधून प्रकाशित झालेल्या 'रश्मिन' या दिवाळी अंकात हा लेख प्रथम प्रकाशित झाला आहे.)

Good old Indian habits

I'm writing this post after a long gap. Its been quite a time after the Europe tour, but the European Fiesta is still on the mind.  The reflections of those snowy mountain caps, the lakes, monuments simply not letting me send them off the mind. There is yet another reason that I keep recollecting those moments of the tour. I'm still in a mood to study the impressions of we Indians on the people here. We came across so many Indians during this tour that now I tend to believe that Indians are the most travel-loving community in the world. It was great to see so much Desi crowed on board. They made the trip more friendly. But there were few moments of embarrassment also. I realized during the tour that Indians are still known abroad for their same good old habits. Punctuality as per our own IST, untidiness and those famous lines 'Sab kuch Chalta hai'. We got to experience this Indian attitude so many times during the tour, that when I was asked to write about my experiences for one Diwali ank, this was the only thing which I wanted eagerly to write about.

You can read the full article in the post to follow. The point of sharing these experiences is again little selfish. It  will help me to behave myself. I should not be responsible in any way for firming those embarrassing  impressions of my nation. This writing will always remind me to take care about it.

Wednesday, July 11, 2012

Bollywood rocks


I'm a big fan of Hindi movies. I love to watch Cinema and like to appreciate it. But some people like to live that filmy life. Their emotions, expectations, comments, reactions,  feelings are as per the guide book called Bollywood movies. I've seen these stereotypical characters romancing around since my college days. Any ways...that is another story. But I was not aware how much this so called Bollywood has its impact world over. 
To go on the same lines of last post, Shahrukh Khan is supposedly India's representation in Europe. I was quite astonished to see his presence on Swiss mountaintops and in Italian market places.

Bollywood in Alps
Mt Titlis is one of the leading attractions for tourists in Switzerland. We have to take 3 cable cars to reach the top of the mountain. As you elevate, you could see picturesque Alps around you. There is a nice Restaurant,  Swiss cultural exhibition and ice caves on top. There's a viewing gallery which takes you out in snow park. As we came out to enter Snow park...there were these 'good old friends' to receive us. Shahrukh Khan and Kajol. They are there at height of 3000 meters above sea level and thousands of miles away from actual Bollywood. Yeah they are there in life size cut-outs. And let me tell you there is no other cut-out or poster around. There is nothing else but these two standing on sparkling white snow. Our Indian friends were posing merrily with Kajol and Shahrukh in Swiss. LOL !!
Check the location of Bollywood Restaurant
One more to go...Indian food abroad needs a separate post.  You get excellent Punjabi food on Mt Jungfrau..another mountain top in Swistzerland... No brownie points to guess the name of the Restaurant now... Yes its  Bollywood Restaurant !! 

Mt Jungfraujoch is one more famous tourist destination in Swiss. It's altitude is even higher than Mt Titlis and only a mountain train takes you to the top. Jungfraujoch is the highest altitude train station in Europe. As per any other tourist destination you will get Sandwiches, tea /coffee in small stalls here. Only two full fledged restaurants are there. One is Chinese and another apna Indian. Bollywood rocks !!

Tuesday, July 10, 2012

Namaste, Shukriya and Shahrukh khan, Sonia Gandhi

The first thing I realized coming here in UK – We have to redefine our identity here. All the Indians here refer each other as ‘desi’ and rest of the Europeans refer us as 'Asians' and not 'Indians' specifically. All the restaurants serving Indian food are 'Indian restaurants' or 'desi restaurants'; although half of them are run by our Bangladeshi, Srilankan or Pakistani bhai.
So I was just an Asian to the localites . Although you are a foreigner here in London, you are expected to know their language well. Plus you have to understand the British culture too. And it’s quite fair on their part, after all we are well exposed to this Englishness for not less than 150 years.
Shahrukh at Mt Tirlis, Switzerland
But cross the English channel and realise the difference. You will be treated as ‘Indians’. This was my experience. At least in well crowded tourist places, you will surely get the greeting ‘Namaste’ if you are travelling with Indian group. They recognise you as 'Indians' and not mere 'Asians'. They will make sure, you are comfortable in their country by greeting in your native language. This was my experience in France, Switzerland, Austria and Italy as well. Sometimes to lure you buying things, Salesman may speak few Hindi words. Knowing that, these are all salesman's tactics.. still, it creates certain warmth.

In a patience testing (read never ending) queue for Eiffel tower top floor when you hear a 'Shukriya' from a guard at Baggage check counter, it certainly gives pleasure. A French guy is saluting you in Hindi,...  feels good specially after your English experience.

Italian Connection
This was quite frequent in Italy. I was welcomed by one Italian shopkeeper by salutation in Italy followed by 'India - Italy; I -I.... equal' !!!!  Again a feel good factor. So we are equal finally. (Don't ask me whether this realisation is on the backdrop of this infamous Italian economy Shrink).
On a busy Saturday afternoon, we sailed through a boat to reach the famous city of Canals - Venice.  In a very crowded dock area in Venice, a salesman selling souvenirs tried convincing us by greeting ‘Namaste’ followed by words 'you from India – India - Shahrukh Khan'.Now, that was a kick. So Shahrukh is the identity of Indians abroad!! Phew!!! (Satyamev Jayate :P Alas !!)
No need to tell you that I didn't bother to even look at items he was selling. 

One more example again from this Italian Canal city. Venice is also known for its glass works/ artifacts apart from Gondolas...specially Murano glass. Murano Island is the famous tourist place for its glass factories. You can get to see demonstrations of the art here. We visited one of the Murano glass factories and the person giving demonstration of their work concluded with 'Shukriya' saluting towards our Indian group. Furthermore wittingly he told us, 'Give my regards to our Sonia Gandhi'.